दलित साहित्य अकादमीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. लेखक मंगेश मसुरकर संग्रहित दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोप प्रकाशन देखील होणार आहे.
गुरुवार दि.१६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील दहिसर पुर्व मधील विठ्ठल मंदिरातील स्वामी माधवेंद्र सभागृहात होणार आहे. प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दत्ताराम घुगे यांच्या सौभाग्यवती स्व.माधुरी दत्ताराम घुगे यांचे प्रथम वार्षिक श्राद्ध-पुण्यस्मरण आहे. यांच्या स्मरणार्थ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जेष्ठ विचारवंत डॉ.सुरेश प्रभाकर प्रभू मसुरकर, किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे, संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष मारूती उगले, भारतीय दलित साहित्य अकादम अध्यक्ष पंढरीनाथ पवार, काशीमठ विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान अध्यक्ष मोहनदास मल्या, मधुसुदन पै, नाशिक पत्रकार योगेश पद्माकर दराडे-पाटील, साहित्यिक पद्माकर दराडे-पाटील, विचारवंत डॉक्टर लक्षराज सानप-पाटील, सुरेश चाफेकर, बोरिवली कस्तुरबा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल रामचंद्र आव्हाड, ज्ञानेश्वर सांगळे असे अनेक प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तसेच महत्त्वपूर्ण या कार्यक्रमात दत्ताराम घुगे चरित्र ग्रंथ बायोस्कोप प्रकाशन सोहळा डॉ.सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पत्रकार उमा सुरेश प्रभू यांच्या हस्ते गुरुवार दि.१६ मार्च २०२३ सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दहिसर पूर्व काशीमठ विठ्ठल रखुमाई मंदिर माधवेंद्र सभागृहात सभागृहात, महिला पुरस्कार गुणगौरव सोहळा होणार आहे. विशेषत नाशिक जिल्ह्यातील मनमाड ह.भ.प मुक्ताई सांगळे यांचे किर्तन - निरूपण प्रबोधनात्मक आयोजित करण्यात आले आहे.
दलित साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.
*सर्वोच्च जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी* -
१. ह.भ.प - मुक्ताई सांगळे (मनमाडकर) - राष्ट्रीय कीर्तनकार
२. गंगुबाई शंकर बोडके - पंढरीचे वारकरी
३. मनिषा अशोक चौधरी - आमदार - दहिसर विधानसभा
४. निशा सुधीर सावर्डेकर - आदर्श गृहिणी
५. वृषाली विजय बागवे - जनसेविका
५)मधुरा सुरेश चाफेकर, उद्योजक.
सन्मान गौरव पुरस्काराचे मानकरी -
१. सुनिता सचिन नागरे - जेष्ठ आदिवासी सेविका
२. सुमन सुभाष नागरे - योग गुरु (योगाभ्यास)
३. सुनिता प्रभाकर पाटील - समाजसेविका
४. अलका विकास सानप - साहित्यिका
५. वनिता कांबळे - उद्योजिका
६. अलका सुर्वे - जनसंपर्क-बोरिवली ब्लड सेंटर, दोशी चॅरिटेबल ट्रस्ट, दहिसर पश्चिम
*महिला युवा सन्मान गौरव पुरस्काराचे मानकरी *-
१. ॠतुजा दिलीप घुगे - सूत्र संचालक निवेदिका
२. गायत्री सरला दिनेश घुगे - प्रसार माध्यम तज्ञ
३. अनुराधा मंगेश मसुरकर - उद्योजिका
४. पल्लवी मनिष नाईक - उद्योजिका आणि जनसेवक
५. लता धिरज पाटील - आदिवासी जनसेविका,
६. लत्ता धीरज पाटील, आदिवासी सेवक,
या पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दत्ताराम घुगे. ४०५, शिवम संत तुकाराम महाराज चौक, युनियन बँक समोर, छत्रपती शिवाजीमहाराज संकुल, आनंद नगर, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८.Email ghuge.dattaram@gmail.com यांना संपर्क करावा.
No comments:
Post a Comment