Friday, 3 February 2023

कल्याण तालुक्यात मलेरिया, टायफॉईड, न्यूमोनिया, जुलाब उलटीची साथ, ग्रामीण रुग्णालय फुल्ल, दुषित पाण्याचा परिणाम ?

कल्याण तालुक्यात मलेरिया, टायफॉईड, न्यूमोनिया, जुलाब उलटीची साथ, ग्रामीण रुग्णालय फुल्ल, दुषित पाण्याचा परिणाम ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागात मलेरिया, टायफॉईड, न्यूमोनिया आणि जुलाब उलटीची भयानक साथ पसरली असून आजच्या दिवशी ग्रामीण रुग्णालयातील सर्व बेड भरल्याचे दिसून आले. दरम्यान ही परिस्थिती दुषित पाण्यामुळे झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात योग्य काळजी न घेतल्यास भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कल्याण तालुक्यात रायते प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना मोठी आहे, या योजनेवर १५ ते २० गावे व पाडे, अवलंबून आहेत. शिवाय इतर गावाना स्वतंत्र तर कुठे बोअरवेल, विहीर, चे पाणी पुरवठा केला जातो. सध्या तालुक्यात काही ठिकाणी वीटभट्टी सुरू झाले आहेत. यावर शेकडो मजूर काम करतात, ते कसले पाणी पितात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशातच कधी थंडी, तर कधी उकाडा, मधेच ढगाळ वातावरणामुळे याचा परिणाम आरोग्यावर होतो.

आज एकाच दिवशी तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे तब्बल १० ते १५ पेशंट भर्ती झाले, यांच्या विविध तपासण्या केल्या असता त्यांना मलेरिया, टायफॉईड, जुलाब उलटी, आणि दोन लहान मुलांना न्यूमोनिया असे विविध आजार झाल्याचे दिसून आले. यामुळे हाँस्पिटलचा पुरुष वार्ड हाऊसफुल्ल झाला. याशिवाय इतरही पेशंट दाखल होत होते. यामध्ये कांबा, वाघेरापाडा, गोवेली, म्हसकळ, घोटसई, वरप, म्हारळ, शेरे, बापसई आदी गावातील पेशंटांचा समावेश असल्याचे दिसून आले. या संदर्भात गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकां-यांना विचारले असता हे दुषित पाण्यामुळे झाले असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पाणी उकळून प्यावे असे अवाहन ही त्यांनी केले. याबाबत पाणी पुरवठा विभाग व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील केली आहे.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...