संगमेश्वर मधील मावळंगे गावातील जय मानोबा मंदिराच्या जिर्णोद्धार निधी करीता नवतरूण मित्र मंडळ मुंबईतर्फे नमन प्रयोगाचे आयोजन !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर /दीपक कारकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालूक्यामध्ये वसलेल्या मावळंगे या गावचे जागृत देवस्थान,म्हणजे जय मानोबा. अनेक भक्तांच्या हाकेला धावणारे, वर्षातून एकदा येणारा सण होळी या सणाच्या एक दिवस आधी या गावची वार्षीक जत्रा असते.या जत्रेला हजारो भाविक उपस्थित राहतात. अनेक भक्तांचे नवस पावन होणारे जागृत देवस्थान जय मानोबा. मावळंगे गावामध्ये एक छोटीसी वसलेली मांडरकर वाडी, या वाडीमध्ये पुर्वजणांनी बांधलेल जय मानोबा मंदिर आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धार निधी करीता, नवतरूण मित्र मंडळ मुंबई, या मंडळाचे अध्यक्ष- श्री.अशोक मांडरकर, सचिव- श्री.गणपत निवळेकर, खजिनदार-श्री.नारायण मांडरकर. आणि सर्व कार्यकारी कमिटी सभासद, यांनी आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मावळंगे (मांडरकर वाडी) यांचे कोकणची लोककला बहूरंगी नमन रविवार दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ठिक.८ः३०वा. मुंबई मधील नाविन्यपुर्ण नाट्यगृह साहित्य संघ मंदिर गिरगाव चर्नी रोड येथे सादर होणार आहे.
अनेक वर्ष गावाच्या ठिकाणी आपली कला अगदी जोमाने जोपासत असतात. प्रथमच या मंडळाचे २० हौशी कलाकार मुंबईच्या रंगमंचावर कला सादर करणार आहेत. पुरुष कलाकारच स्त्री पात्राचा साजशृंगार करुण गण, गौळण आणि चक्रिय न्याय अर्थात डाव युध्दाचा हि काल्पनिक नाट्यकृती सादर करणार आहेत. याचे नाट्याचे लेखन- रुपेश दुदम यांचे असून दिग्दर्शक - श्री.दिनेश गं. मांडरकर यांंनी केल आहे. गीत रचना-श्री.अशोक दुदम यांची आहे. गायक म्हणून-दिनेश भा.मांडरकर, विनायक मांडरकर, वेदांत मांडरकर हे करणार आहेत. कार्यक्रमाचे सुञधार- किशोर मांडरकर आणि तुकाराम मांडरकर आहेत. व्यवस्थापन दत्ताराम मांडरकर आणि सर्व कलाकारी मंडळी यांचे आहे. तरी कोकणातील नमन, शक्ती -तुरा प्रेमी रसिक मायबाप यांनी या कार्यक्रम ला मोठया संख्येने उपस्थित राहून कोकणची ही कला जोपसण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment