माघ पौर्णिमेस बाळासाहेबांची शिवसेनेच्या माध्यमातून हजारो हिंदू जाणार "श्री मलंग गडावर" !
कल्याण, प्रतिनिधी : रविवारी ५ फेब्रुवारीला माघी पौर्णिमा निमित्ताने "श्रीमलंग गडावर" बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर जाऊन आरती करून दर्शन घेणार आहेत. तसेच "हर हर महादेव" अशा गगन भेदी गर्जना करीत खांद्यावर भगवे ध्वज घेऊन हजारो हिंदू बांधव आणि शिवसैनिक जाऊन दर्शन घेणार आहेत.
सध्या राज्यात युतीचे शासन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. असंख्य हिंदूनिष्ठ संघटना या धार्मिक कार्यात हिरीरिने भाग घेणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेस आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, राजेश मोरे, भुल्लरसिंग महाराज, कल्याण महिला संघटक छायाताई वाघमारे मलंग मुक्तीचे अभ्यासक दिनेश देशमुख, आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
श्री मलंग गडावरील मच्छींद्रनाथांचे मंदिराबाबत श्रीमलंगडाची माहिती देताना दिनेश देशमुख म्हणाले, श्रीमलंग मच्छिद्रनाथ मंदिर हे मुळ हिंदूंचे देवस्थान आहे, हिंदूचे पुजास्थान आहे. पवित्र क्षेत्र म्हणून या देवस्थानाला फार मोठा इतिहास आहे. परंतु दुर्दैवाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुर्लक्षपणामुळे मुसलमानांची वस्ती वाढत चालली आहे. कोर्टाने हे मंदिर सर्व धर्मियांचे स्थान आहे असे जाहिर करुन विश्वस्त नेमले. पण विश्वस्त हिंदू पध्दतीने होणारी पूजा अर्चा नष्ट करु पाहत आहेत. हिंदूंना पुजा धार्मिक विधी करण्यासाठी अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी या आंदोलनामागे अन्य धर्मियांचा द्वेष करणे व त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे हा हेतू नसून श्री मलंगगडावर हिंदूंचे वाहिवाट चालू ठवणे हा आहे. हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट ठरणार आहे असे प्रतिपादन गुरूवारी चलो मलंगगड पत्रकार परिषदेत केले.
तरी सर्व हिंदू बांधवांनी श्रीमलंग नाथाच्या माघी पौर्णिमच्या उत्सवात रविवारी सामिल व्हावे व धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला "जय मलंग श्रीमंगल" हा मंगलनाथांचा उत्सव प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरा करावा असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment