Friday, 24 February 2023

नालासोपारा पश्चिम येथे शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित भव्य आधार कार्ड शिबीर दिवस पहिला संपन्न....

नालासोपारा पश्चिम येथे शिवसेना व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित भव्य आधार कार्ड शिबीर दिवस पहिला संपन्न....

वसई, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम येथे शिवसेना आयोजित जिजाऊ संस्था यांच्या वतिने आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आधार कार्ड शिबीराअंतर्गत नविन आधार कार्ड, आधार कार्ड दुरूस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक करणे इत्यादी सेवा देण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन पत्रकार मुकेश त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहरप्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, उपशहरप्रमुख श्रीधर मर्च॔डे, विभागप्रमुख गणेश मुणगेकर, विभागप्रमुख जितेंद्र ठाकुर, संजय कदम, विभागप्रमुख किरण काळे, उपविभाग प्रमुख सचिन परब जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक अमित नाईक व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...