सावळदबारा सर्कलच्या विकासासाठी 28 कोटींचा निधी !
*कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा पुढाकार ; पाणी पुरवठा, रस्ते व जनसुविधांची होणार कामे*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : कृषिमंत्री तथा सिल्लोड - सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सावळदबारा सर्कलच्या विकासासाठी जवळपास 28 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, पाणंद रस्ते, लेखशीर्ष 3054, 2515 अंतर्गत सर्कलच्या विविध गावांत जनसुविधांची कामे होणार आहे. शुक्रवार ( दि.24 ) रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते मंजूर कामांचे उदघाटन झाले असून लगेचच या कामांना सुरुवात होणार आहे. उद्घाटन झालेली विकास कामे तातडीने सुरू करून काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
सोयगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आलेला असून तालुक्यातील विविध गावे, तांडा, वाडी वस्त्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधेसह पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयगावच्या विकासासाठी भरीव निधी दिला असून विकासाच्या माध्यमातून वर्षभरात सोयगावचे नवीन रूप पहायला मिळेल असा विश्वास ना.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
सावळदबारा सर्कल मधील पिंपळवाडी, देव्हारी, टिटवी, पळासखेडा, सावळदबारा , डाभा, नांदा तांडा, घाणेगाव, मोलखेडा, हिवरी, चारुतांडा, रावळा, जावळा, जामठी, वरखेडी या गावांत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था साठी 10 कोटी तर पानंद रस्ते, लेखशीर्ष 2515, 3054 अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी 18 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, दारासिंग चव्हाण, शिवप्पा चोपडे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, लुकमान अहेमद, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले, शाखा अभियंता दीपक मोगडे, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश शिंदे, शाखा अभियंता गजानन जंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अजय टाकसाळे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, फदापूर पोलीस स्टेशनचे एपीआय भरत मोरे यांच्यासह टिटवी सरपंच भागवत जाधव, डाभा सरपंच राहुल वेल्लोडे, पिंपळवाडी सरपंच संतोष आळे, घाणेगाव सरपंच सुरेश चव्हाण, सावळदबारा उपसरपंच आरेफ महंमद, देव्हारी सरपंच पंडित राठोड, मोलखेडा सरपंच ज्ञानेश्वर वारंगणे ,रावळा जावळा चे सरपंच बीबी कलिम सय्यद यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment