गावकऱ्यांची एकजूट अन पिसादेवीला पोलीस चौकी मंजूर..!
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : पिसादेवी व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. या चोरी करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. या विरोधात समस्त पिसादेवीकारांच्या वतीने मदन भैय्या काळे यांच्या नेतृत्वाखाली आज उपोषण करण्यात आले. या आंदोलनाची पोलीस प्रशासानाने त्वरित दखल घेत अंदोलन स्थळाला भेट दिली.
पिसादेवी ग्रामस्थांच्या ज्या मागण्या होत्या त्याची पोलीस प्रशासनाने दखल घेत आपल्या पिसादेवी व परिसरासाठी एक पोलिस चौकी मंजूर केली आहे. लवकरच पिसादेवी व परिसरासाठी पोलीस चौकी सुर करणार आहेत. पिसादेवी व परिसरासाठी पेट्रोलिंग गाडी वाढवण्याचे आश्वासनही यावेळी प्रशासनाने दिले.तसेच प्रत्येक कॉलनीत सुरक्षा बैठक घेतल्या जाणार आहे.
आपल्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्यामुळे पोलीस निरीक्षक संजय खंडागळे यांच्या हस्ते मदन भैय्या काळे यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
याप्रसंगी भाऊसाहेब बापू काळे, सरपंच राजेश काळे, उपसरपंच शेख सत्तार, पोलीस पाटील देविदास काळे, ताराचंद काळे, अरुण काळे, मदार शेख, प्रभाकर जाधव, शिवाजी पखे, नंदू काळे, नानासाहेब धामणे, अमोल काळे, अनिल काळे, झोपे साहेब, प्रदिप शिंदे, सुदर्शन काळे, दिनेश देशमुख, बापू एकनाथ काळे, नरवडे साहेब, गोडसे पाटील, जमधडे साहेब, शुभम देशमुख, उदय गायकवाड, गवळे साहेब, अतुल जाधव, महेश जांभोरकर, अहिरे साहेब, प्रल्हाद पवार, मदन राठोड, राजू दुबिले, शिवाजी सोळुंके, उषा सोळुंके, सविता हुसे, महादेव हुसे, राहुल देवकर, सचिन, सुनील देशमुख आदी ग्रामस्थांनी उपोषणात सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment