Saturday, 18 February 2023

शिवसेनेच्या वतीने (उ.बा.ठा) आज (१९ फेब्रुवारी) क्रांतीचौक येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन !

शिवसेनेच्या वतीने (उ.बा.ठा) आज (१९ फेब्रुवारी) क्रांतीचौक येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन !

"लोककल्याणकारी, रयतेचे राजे" 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उ.बा.ठा) वतीने आज १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे, यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, शहर संघटिका आशा दातार, विद्या अग्निहोत्री, भागू अक्का शिरसाट यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...