"खचलो नाही खचनार नाही"
मुंबई, अखलाख देशमुख, दि १८ : महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेले असले तरी या गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असे खुले आव्हान उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. आज उघड्या जीपवरून भाषण करतांना त्यांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केले.
मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या शिवसैनिकांच्या ताकदीवर मी उभा आहे. चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्यांच्या छाताडावर उभे राहू .
No comments:
Post a Comment