धगधगती मुंबई चे संपादक भिमराव धुळप यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - प्रा.शरद पाटील
मुंबई (शांताराम गुडेकर)
धगधगती मुंबई वृत्तपत्र १३ वर्ष पूर्ण करून १४ व्या वर्षात पदार्पण करत आहे, तेरा वर्षाच्या काळात धुळप यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक कामे केली त्याचबरोबर ग्रामीण भागातून मुंबईत जाणाऱ्या रुग्णांना मदत, वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करत असतात. आमची संस्था १९७२ साली स्थापन झाली अनेक अडचणींवर मात करत संस्थापक जोसेफ फर्नाडिस यांनी या वृद्ध सेवाश्रम चा भूखंड मिळवला त्यासाठी त्यांनी स्वतःचा भविष्य निर्वाह निधी देऊन सदर जागा विकत घेतली, एक खोली बांधून वृद्ध सेवा सुरू केली. आज या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करताना तुमच्यासारखी सामाजिक कार्ये करणाऱ्या व्यक्तीमुळे हे शक्य होत असते. आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपले व आपल्या सहकार्याचे अभिनंदन करतो असे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी सर्व वृद्धांना टॉवेल, कंगवा, टूथपेस्ट, टूथब्रश, खोबरेल तेल, बाटली, यासह अन्नदान देण्यात आले.
यावेळी वृद्ध सेवाश्रम मधील सर्व महिला पुरुष यांच्यासह सरांचे सहकारी सातपुते साहेब, समाजसेवक जगन्नाथ भावके, संजय धुळप, सुनील, संदीप धुळप, संपादक भिमराव धुळप यांच्यासह संस्थेच्या प्रमुख श्रीमती रेखा माळी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment