Saturday, 18 February 2023

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 20 फेब्रुवारी सोमवारपासून बेमुदत संप जोरदार तयारी सुरू !

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 20 फेब्रुवारी सोमवारपासून बेमुदत संप जोरदार तयारी सुरू !

चोपडा, (जिल्हा जळगाव).. महाराष्ट्रात येत्या 20 फेब्रुवारी सोमवार पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी  कर्मचारी संघटना कृती समिती तर्फे कृती समितीचे अध्यक्ष एम ए पाटील, कार्याध्यक्ष दिलीप ऊटाणे तसेच अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे सचिव कॉ. एडवोकेट माधुरीताई क्षीरसागर, काँ शुभा शमीम आदीं नेत्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यातही संभाजी जोरदार तयारी सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात नमूद करण्यात आले आहे की या संपाचा मुख्य मागण्यांवर गेल्या चार-पाच महिन्यापासून नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महिला बाल विकास मंत्री श्री लोढा तसेच त्यांचे सहकारी आणि संबंधित खात्याचे आयुक्त /सचिव यांच्याशी चर्चा सुरू आहे, पण प्रत्येक वेळी त्यांनी आश्वासन दिले. मानधन वाढ व इतर प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून  दिलासादायक निर्णय घेऊ अशी आश्वासने दिली त्यासाठी अनेक मुदतीही दिल्यात परंतु सरकारचीआश्वासने पोकळ निघालेत त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या मोबाईल वॉरंटी गॅरंटी संपलेली असून अंगणवाडी सेविका स्वतःचे मोबाईल वापरत आहेत, दुरस्तीसाठी हजारो रुपये पदरचे खर्च केले तेही दिले नाहीत. मोबाईल वापसी मोहीम देखील चालू आहे. परंतु तो मोबाईल काही बदलून दिलेला नाही. ५ वर्षापासून मानधन वाढ नाहीं .४/५ वर्षापासून सेवा निवृत्त झालेल्या सेविका मदतनीस यांना अनुक्रमे १ लाख व ७५००० रुपये सेवा निवृत्ती लाभ दिलेला नाही .रिक्त जागा भरपूर आहेत .अधिकारी वर्ग अपुरा आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही त्याचे प्रमाणे 'मोबाईल हाताळणी प्रोत्साहन भत्ता' कमी असून  सर्वांवर कामाचा लोड वाढत आहे आणि वेळोवेळी चर्चा करूनही निर्णय न झाल्याने नाईलाजास्तव कृती समितीला संपाच्या निर्णय घ्यावा लागला असे कॉ महाजन यांनी म्हटले आहे.

या संपकाळात अंगणवाडीचे सर्व कामकाज बंद राहणार असून खाऊ वाटप अहवाल देणे, आरोग्य खात्यापासून सर्वांना माहिती देणे सर्व बंद राहणार आहे सरकार जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. जळगाव जिल्ह्यात 'अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन' ही कृती समितीची मुख्य संघटना असून आहे. तिच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आदिवासी, नागरी प्रकल्प, मिनी अंगणवाडी ,केंद्रे यामधील आयटक नेतृत्व खालील ३००० सेविका मदतनीस बेमुदत संपत भागीदारी करणार आहेत व त्या दृष्टिकोनातून संपाची जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी करीत आहेत त्यासाठी कॉ अमृत महाजन यांचे सह सर्व ताईसाहेब कॉ ममता महाजन, वत्सला पाटील, नीलिमा पाटील, पुष्पा राजपूत, चंद्रकला चिंचोरे, प्रेमलता पाटील, सुमित्रा बोरसे, नंदा वाणी, भारती पाटील, सूनंदा पाटील, सिमा बागड, लता पाटील, सूलेखा पाटील, रंजना पाटील, चित्रा वारे, अश्विनी देशमुख,, सूलक्षणा पाटील, मिना काटोले, उषा पाटील, पूष्पा मोरे, अंजना माली, मंगला माळी, संगीता पाटील, ज्योती पाटिल, प्रतिभा पाटील, नुरूनीसा हिफाजत अली, फातेमा बी, लक्ष्मी वानखेडे, उषा भालेराव, वंदना कंखरे, रिता तायडे, रेखा अहिरे, रंजना मराठे, अशहर खान, छाया चित्ते, राधा पाटील, मिना तडवी, गूफ्त्यार तडवी, कवीता वारे, सूनंदा तायडे, विमल नेहते (वरणगाव), रोहिणी सूरवाडे (किन्ही), हिराबाई पाटील, आदि शेकङो भगीनी अथक परिश्रम घेत आहेत असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

संप प्रचार दरम्यान आयटक संघटनेत अमळनेर तालूक्यातील ढेकू बिट पाचोरा नागरी जाँईन झाले. सर्व सेविका मदतनीस ताईचे जिल्हा आयटक तर्फे स्वागत करण्यात आले .

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...