छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी (पुरवठा) वर्षाराणी भोसले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
शासकीय परिपत्रकानुसार ‘जय जय महराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
आज शिवजयंती निमित्ताने हे राज्यगीत शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर गायन करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. त्याप्रमाणे ‘जय जय महराष्ट्र माझा’ या गीताचे सामुहिक गायन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यलयास चित्रकार श्री. आवारे यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले. श्री. आवारे यांनी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन G 20 परिषदेत होणार असल्याचेही श्री. गव्हाणे यांनी सांगितले. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता श्री. आवारे यांनी अजिंठा लेणीतील विविध लेण्यांचे चित्र रेखाटल्याबद्दल त्यांचे सर्वांच्यावतीने कौतुक करण्यात आले.
No comments:
Post a Comment