Sunday, 19 February 2023

छत्रपती विद्यालय गारखेडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी !

छत्रपती विद्यालय गारखेडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १९ : 
ढोल ताशे आणि लेझीम च्या तालात ठेका धरणारे बालविद्यार्थी शाळेचा परिसर आणि भारावलेले वातावरण, नाटिकेतून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.

परिसरात भव्य रॅली काढून पुंडलिक नगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण, प्रशालेचे सहशिक्षक रामदास वाघमारे, राजेश आंधळे, जितेंद्र शिंदे, आण्णा आंधळे, सोनाली पाटील, कांबळे मँडम, इत्यादींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमांद्वारे 'झुलवा पाळणा, एकच राजा.., या बहारदार गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकाची मने जिंकली. 

या गाण्यातून महाराजांना मानवंदना दिली.संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर वर्ग, पालक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...