दिव्यांग बांधवांसाठी जामनेर येथे मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन...
जळगाव/ जामनेर, अखलाख देशमुख, दि १९ : प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे प्रयत्नाने रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यात *“मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर”* चे आयोजन करण्यात आले आहे.
आज सदर “मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर” चे उपजिल्हा रुग्णालय *जामनेर* येथे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली, यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शिबिरास उपस्थित राहून दिव्यांग बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शिबिराची माहिती दिली.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा चिटणीस नवलसिंग पाटील, जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी नाना सोनार, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक अतिष झाल्टे,बापुराम हिवराळे, सुहास पाटील,शरद पाटील,सुभाष सुरवाडे, दिपक तायडे, नितीन झाल्टे, अनिस शेख, शेख रिझवान,उल्हास पाटील, खलील भाई डॉ. आर.के. पाटील, राजेश सोनवणे, तहसिलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, डॉ.प्रशांत रोडे व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment