Sunday, 5 February 2023

गावोगावी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचित च्या शाखांचे बोर्ड उभे, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा परिणाम !

गावोगावी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व वंचित च्या शाखांचे बोर्ड उभे, शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा परिणाम !

कल्याण, (संजय कांबळे) : नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने जनतेमध्ये कमालीचा उत्साह वाढला आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फलक/बोर्ड गावोगावच्या प्रवेशद्वारा शेजारी लागले असून यामध्ये अँड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडी देखील मागे राहिला नाही, यांचेही बोर्ड दिसून येत आहेत. त्यामुळे नेते, आमदार, खासदार जरी कडून तिकडे गेले असलेतरी सर्वसामान्य जनता मात्र"ठाकरे, या नावाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच पदवीधर शिक्षकांच्या निवडणूका झाल्या. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. केवळ कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निवडून आले. येथेही शेकापचे अर्थात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील हे मतदारापर्यय पोहचण्यात कमी पडले, अपेक्षित प्रचार प्रसार झाला नाही.

पण भाजपाच्या बालेकिल्ल्यात नागपूर मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव धक्कादायक असा होता. तो पक्षाच्या जिव्हारी लागला तर महाविकास आघाडीला उभारी देणारा ठरला. यामुळे सहाजिकच महागाई, बेरोजगारी, उद्योग पळविणे,गद्दारी, खालच्या पातळीवर जाऊन बोलणे, गुंडगिरी, यामुळे त्रासलेल्या जनतेला शिंदे -फडणवी सरकारला बसलेला हा मोठा धक्का उत्साह वाढविणारा ठरला

यामुळेच नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, जरी इकडून तिकडे गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिशी व एकनिष्ठ असल्याचे दाखविण्यासाठी गावोगावी शिवसेनेचे शाखांचे फलक/बोर्ड लागले आहेत.शहापूर तालुक्यातील शेरे, मढ, आंबार्जे, हाल, शेई आदी अनेक गावात शिवसेना शाखा व वंचित चे बोर्ड लागले आहेत.

यासंदर्भात ठाकरे गटाचे शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र शिवराम डोंगरे यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी कुठे गेले तरी कडवट शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ठाकरे या नावात तशी जादू आहे, शिवसैनिकांची निष्ठा फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहे‌. 

आतातरी वंचितचे अध्यक्ष अँड. श्रेदेय प्रकाश आंबेडकर यांनी साथ दिली आहे. आमच्या फायरब्रांड नेत्या सुषमाताई अंधारे आहेतच, अशा सर्व सकारात्मक वातावरणात महाविकास आघाडिचे उमेदवारांनी भाजपाच्या बालेकिल्यात विजय मिळवला आहे, यावरून तसेच सी ओटर्स व इंडिया टुडे यांच्या सर्वेक्षणातून मिळालेला महाविकास आघाडीला "कल, नक्कीच आमचा उत्साह वाढविणारा आहे. यामुळे प्रत्येक गावागावात नव्या दमाने शाखा उभ्या राहतील असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...