जेलुगडे गावात तब्बल ३५ वर्षांनी रंगणार व्यंकोजी वाघ नाटकाचा पुन्हा थरार !
मुंबई -(दीपक कारकर/शांताराम गुडेकर )
गेली अनेक वर्षे लोककला जोपासणारे गाव,व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेलुगडे गावच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री.सातेरी भावई देवीच्या यात्रेनिमित मौजे जेलुगडे ( ता.चंदगड जि.कोल्हापुर ) भावई देवी नाट्य मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.अशोक नार्वेकर (मामा) व निर्माता कु.एकनाथ पु.गावडे यांच्या मार्गदर्शनाने जेलुगडे गावातील गुणवंत,नामवंत हौशी कलाकाराने ३५ वर्षापुर्वी ही कलाकृती सादर केली होती. ३५ वर्षाच्या कालावधीमधे बरीच सामाजिक, कौटुंबिक तमाशा प्रधान नाटके सादर करण्यात आली. मात्र या वर्षी गावातील तरुण तडफदार हौशी कलाकरांना घेऊन रविवार दि.१२/०२/ २०२३ रोजी रात्रौ ठिक ११-०० वाजता कमलाकर बोरकर लिखीत ३ अंकी ऐतिहासिक नाटक सादर करण्यात येणार आहे. तसेच माजी व्यंकोजी वाघ कलाकार यांचा सत्कार सोहळा यनिमित्ताने आयोजित केला आहे. सर्व पंचकोशीतील लोकांना या नाटकाविषयी खुपच उत्सुकता लागली आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनोरंनासाठी सदर नाट्यकृती आयोजित केली असून, ती नाट्य रसिकांची मने जिंकणारी आहे.तरी नाट्य रसिक मायबाप यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment