Tuesday, 7 February 2023

शिवक्रांती हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य आयोजित निबंध स्पर्धेत रत्नागिरीचा सुपूत्र संतोष सारंग याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला..!

शिवक्रांती हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य आयोजित निबंध स्पर्धेत रत्नागिरीचा सुपूत्र संतोष सारंग याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला..!

मुंबई, प्रतिनिधी :
         *"राजमाता जिजाऊसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांच्या जयंती सोहळा निमित्ताने शिवक्रांती हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य* या संस्थेने या  निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यभरातून एकूण १६८ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. परिक्षकांच्या अंतिम निकालाअंती रत्नागिरीचा सूपुत्र "संतोष सारंग" यांनी द्वितीय क्रमांक पटकवला आहे. त्यांच्या पारितोषिकाचे स्वरूप म्हणजे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम ७,७७७/-रुपये.असे आहे. आणि हा पारितोषिक वितरण सोहळा १९ फेब्रुवारी २०२३ ला शिवजयंती सोहळ्यानिमित्त वैराटगड किल्ले पायथा, जिल्हा सातारा येथे होणार आहे. यावेळी शिवशाही व्याख्याते संतोष सारंग यांचे शिवव्याख्यान आयोजन केले आहे. 

         संतोष सारंग यांनी श्री. विठ्ठल रखुमाई नाट्यमंंडळ रत्नागिरी, नाट्यसंपदा, रत्नागिरी, माऊली प्रोडक्शन, मुंबई, श्री. विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई आणि महालक्ष्मी कलामंच,मुंबई या नाट्यसंस्थामधून अनेक नाटकं स्वतः अभिनयाद्वारे, स्वतः दिग्दर्शन करून सादर केली आहेत. त्यांनी सहभाग घेतलेली बरीचशी नाटकं महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धांमध्ये विजेती ठरली आहेत. राजयोग कलामंच मुंबई निर्मित "कुबडा तु बडा !" ही एकांकिका राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धातून सलग तीनवेळा प्रथम क्रमांकाने विजयी झालेली आहे, त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ पुरुष अभिनयाचे पारितोषिक संतोष सारंग यांनी पटकावले होते, 
        वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी प्रवासधारा नाट्यसंस्था मुंबईच्या "उकिरडा" या एकांकिकेमधून नाट्याभिनयाला सुरूवात केली व त्यांच्या या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला होता त्यानंतर गावपातळी, तालुका-जिल्हा, मुंबई विभाग, महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर त्यांनी नाटकं सादर केली आहेत. श्री. विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुंबई च्या विद्यमाने प्रायोगिक रंगभूमीवर यक्षदाह, कोमल गांधार ही पौराणिक नाटकं, लावणी भूलली अभंगाला हे संगीत नाटक, बेबंदशाही, करीन ती पूर्व, हि श्री.ची इच्छा, इत्यादी ऐतिहासिक आणि प्यादी, अचानक, तिचं काय चुकलं? अशा सामाजिक  नाटकातून अभिनय करून रसिकांची मनं जिंकली आहेत. अखिल भारतीय बहुभाषिय नाट्यमहोत्सव राजस्थान राज्य येथे मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करीत "अचानक " नाटक जोधपूर अकॕडमी राजस्थान येथे सादर करून वाहवा मिळवली.
           नातीगोती, अखेर तू येशिलंच, केस नं.९९, जन्मदाता, जाणूनबुजून, चाळ नावाची खट्याळ वस्ती, दिवसा तू रात्री मी, गुड बाय डाॕक्टर, अशा नाटकातून अभिनय आणि काही नाटकातून दिग्दर्शन केले आहे. महालक्ष्मी कलामंच मुंबई च्या *"तुका म्हणे"* या नाटकाचे प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग करून रसिकांची वाहवा मिळवली, शिवाय महालक्ष्मी कलामंचाच्या *"वीर शावाजी"* या ऐतिहासिक  नाटकाचे मुंबई -कोकण- गोवा येथे ३१ प्रयोग यशस्वीपणे सादर केले आहेत.
       संतोष सारंग यांनी नाट्याभिनय, दिग्दर्शक, निवेदक आणि शिवशाही व्याख्याता म्हणून महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर अल्पावधीतंच आपल्या कलेचा दबदबा निर्माण केला आहे.
       त्यांच्या या यशस्वी वाटचालीत शैलेश आंबेरकर, राम सारंग, दत्ता मोरे, अजित पाटील, श्रीकांत पाटील, जयसिंग देसाई, प्रा.अवधूत भिसे, डाॕ. तुलसी बेहेरे, राज जैतपाळ, अमन दळवी, मनोहर सुर्वे, प्रकाश लाड, प्रदिप रेवाळे, गजानन शेट्ये, राजन जाधव, डाॕ. शशिकांत भोबेकर, वैशाली जाधव, परेश मोरे, नारायणबुवा मिरजुळकर, सुधीर वासावे आणि संतोष पावरी यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे.
       संतोष सारंग यांच्या सामाजिक, आरोग्यक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुणांमूळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, सन २०२२-२३ रायगड विश्वविद्यालय ऐतिहासिक विषारद या पदवी परीक्षेच्या प्रथम वर्ष सत्रामध्ये अतुलनीय यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शिवव्याख्याता म्हणून त्यांची ख्याती आहेच त्यात निबंध स्पर्धेतील या यशाने लेखणीतील कौशल्य पहायला मिळाले त्यामुळेच त्यांचे सर्व क्षेत्रामध्ये कौतुक होत आहे.
=======================

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...