डॉ. कु. दिपाली रमेश कुळये यांचा समस्त कुळये परिवारतर्फे सन्मान !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील शिरवली गावची सुकन्या कुमारी दिपाली रमेश कुळये हिने आपले शिक्षण जि.प.पू.प्रा. शाळा शिरवली (इ.७ पर्यंत) आणि आदर्श विद्यामंदीर वाटूळ (इ.८वी ते १० पर्यंत) या शाळांमधून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबई शहरामध्ये दाखल झाली. मुंबई मध्ये डी.जी. रूपारेल कॉलेज ( D.G.Ruparel College) मध्ये अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर श्रीमती.सी.एम.पी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज (Smt. CMP Homeopathic Medical College) या कॉलेजमध्ये डॉक्टर पदवीसाठी शिक्षण सुरु केले. कुमारी दिपाली हिची आर्थिक परिस्थीती खूप हलाकीची होती. तसॆच तिचे वडील श्री.रमेश तुकाराम कुळये यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थीकदृष्ट्या खुप अडचणींना सामोर जावून आपल्या मुलीचं शिक्षण पूर्ण केले.
कुमारी दिपाली हिने आपले वडील आपल्याला शिक्षण देण्यासाठी जिवाचा आट्टा-पिटा करत आहेत. त्यामुळे मला हे शिक्षण घेता येत आहे लक्षात घेऊन तिने सुध्दा आपल्या आई- वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्ध मनात ठेवूनच अभ्यास चालू ठेवला आणि दिपाली हिने श्रीमती. सी.एम.पी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज (Smt. CMP Homeopathic Medical College) मधून चांगले मार्क्स मिळवून बी.एच.एम.एस (Bachelor Of Homeopathic Medicine & Surgery) ही डाॅक्टर पदवी मिळविली. कु.दिपाली रमेश कुळयॆ (B.H.M. S) डॉक्टर झाली म्हणून तीचा सन्मान करण्यासाठी समस्त कुळयॆ परिवार, (वरची वाडी) सह नातेवाईक व मित्रमंडळी एकत्र येऊन तिला पुष्पगुच्छ आणि छोटीसी भॆट वस्तू देऊन अभिनंदन सह शुभेच्छा देत सन्मानीत केले.
No comments:
Post a Comment