मुलुंडमध्ये लवकरच हौसिंग सोसायटी व्यवस्थापन प्रमाणपत्र कोर्सला सुरुवात; नाव नोंदविण्याचे आवाहन !
मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग चे हौसिंग सोसायटी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम मुलुंडमध्ये लवकरच सुरू होणार आहे. कोर्स संपूर्णपणे मराठी भाषेत असणार आहे. नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी 9022747507 या भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.या विषयातील तज्ञ संतोष (भाई) पालव यांचे मार्गदर्शन होणार आहे. सदर कोर्स सहा दिवस असेल (आठवड्यातून एकदा किंवा मागणीनुसार). प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन या प्रमाणपत्र कोर्समध्ये गृहनिर्माण संस्थांशी संबंधित असणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात याबाबत संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कोर्स करियरच्या दृष्टीने यशाच्या पायऱ्या चढणारा आहे. हा कोर्स संपूर्णपणे मराठी भाषेत शिकविण्यात येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतील. हा कोर्स व्यवसायिक असून त्याचदृष्टीने अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.
आपण ज्या गृहनिर्माण संस्थेत राहतो. त्याबाबतचे कामकाज नियमानुसार कसे झाले पाहिजे, हे सांगितले जाणार आहे. आता गगनचुंबी इमारती बांधल्या जात आहेत. म्हणजेच गृहनिर्माण संस्थाच्या इमारती यांना एक छोटेसे पंरतु आधुनिक खेडे आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या संस्थांचे दैनंदिन कामकाज होणे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. अनेक ठिकाणी वेतनावर व्यवस्थापकाची नियुक्ती करावी लागत आहे. अनेकदा हे व्यवस्थापक प्रशिक्षित नसल्याने संस्थेचा कारभार हाकताना तांत्रिक, कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठीदेखील ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग चा हौसिंग सोसायटी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
No comments:
Post a Comment