Thursday 2 March 2023

आरटीईअं तर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू !

आरटीईअं तर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू !

 *अंतिम तारीख 17 मार्च*

ठाणे, प्रतिनिधी - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाद्वारे जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित/विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून ती 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

            सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत 25% कोट्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका मध्ये एकूण 629 पात्र शाळा असून एकूण १२२७८  रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर दि. १ मार्च २०२३  दुपारी ३.००  ते  १७ मार्च २०२३ रात्री १२.०० वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती  शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जांची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. कारेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...