Thursday 2 March 2023

रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा औरंगाबाद मध्ये जल्लोष !

रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा औरंगाबाद मध्ये जल्लोष !

कांग्रेस पक्षाचे उमेदवार रविंंद्र धंगेकर मोठया मताधिकांनी निवडुन आल्याबद्दल  शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडुन व मिठाई वाटुन जल्लोष साजरा करण्यात आला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंंद्र धंगेकर कसबापेठ येथे प्रचंड बहुमताने निवडुण आल्याबददल औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जल्लोषाचा कार्यक्रम पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे संध्याकाळी ४ वाजता आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली मिठाई वाटुन व फटाके फोडुन जल्लोष करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, आकेफ रजवी, कैसर बाबा, दिपाली मिसाळ, अनिता भंडारी, अनिल माळोदे, मंजु लोखंडे, आसमत खान, शेख रईस, निलेश अंबेवाडीकर, रवि लोखंडे, शेख मोईस, शिला मगरे, बबन डिंडोरे पाटील, प्रा.प्रकाश वाघमारे, शेख फैज, निर्मला शिखरे, सय्यद फैयाजोददीन, सलीम खान, लियाकत पठाण, सय्यद युनुस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

वृत्तांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...