Thursday 2 March 2023

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहात अटक ! प्राण्यांचा छळ प्रतिब़ंधक गुन्हात मागितली लाच ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहात अटक ! प्राण्यांचा छळ प्रतिब़ंधक गुन्हात मागितली लाच ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धनंजय लक्ष्मण फर्डे वय ४९ वर्षे याने एका ३३ वर्षीय महिलेकडे सुमारे २४ हजाराची लाच मागितली होती, तडजोडी अंती १८ हजाराची लाच स्विकारताना आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फर्डे याला रंगेहात अटक केली. यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी ___

यातील तक्रारदार व इतर ०२ महिला यांचे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्हा नोंद क्रमांक ९६/२३ कलम ५०४,,५०६, तसेच प्राण्याचं छळ प्रतिबंध  अधिनियमचे कलमा ११ प्रमाणे, या गुन्ह्यात  अटक न करणे करीता, आरोपी लोकसेवक  यांनी तक्रारदार यांचेकडे प्रत्येकी ८ हजार रू. प्रमाणे २४ हजार रु  लाचेची मागणी केल्याची प्राप्त तक्रारीवरून, केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये, तडजोडी अंती १८ हजार/- रुपये लाचेची मागणी करून, ती स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले व त्यांचेविरुद्ध आजमाविण्यात आलेल्या लाचेच्या सापळा कारवाईत तक्रारदार यांचेकडून १८ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असताना नमुद लोकसेवक पोलीस हवालदार फर्डे, कल्याण तालुका पोलिस ठाणे याना १३:४४ वाजता येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे .
  

ही कारवाई झाली ___
                  
सापळा पथक - पल्लवी ढगे पाटील . पोलिस निरीक्षक, 
पोहवा/कोळी , पोहवा/पोटे  चा पो शि/ बर्गे यांनी 

सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

दरम्यान कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नवनियुक्त  वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जिंतेद्र ठाकूर यांनी पदभार स्विकारल्यापासून ठाण्यात अनेक अंतर्गत तसेच बाह्य बदल घडवून आणले आहे. यामुळे ब-याच प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. अनेक कामचुकार पोलीस कर्मचारी व अधिका-यावर कडक कारवाई,/ नोटीस बजावल्या आहेत. तरीही अशा घटना घडल्या मुळे तालुका पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...