Thursday 2 March 2023

घाटकोपर येथे ५ मार्चला सुनिता थिएटर नाट्य संस्थेच्या "भुताचे लग्न" या नाटकाचा होणार शुभारंभ प्रयोग !

घाटकोपर येथे ५ मार्चला सुनिता थिएटर नाट्य संस्थेच्या "भुताचे लग्न" या नाटकाचा होणार शुभारंभ प्रयोग !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर /निलेश कोकमकर ) :
             शिवकल्याण स्वाभिमानी संघ आयोजित आणि सुनिता थिएटर नाट्य संस्था निर्मित एक विलक्षण आणि  विनोदाची सांगड असलेले "भुताच लग्न" या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झवेरबेन पोपटलाल सभागृह, घाटकोपर (पश्चिम) येथे रविवार  दिनांक ०५ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सादर होणार आहे.    
           सुनिता थिएटर नाट्यसंस्थाच्या "आनंदी आनंद" या नाटकाला सेलिबेस आणि गॉसिप संस्थेतर्फे आयोजित पू.ल. देशपांडे जयंती निमित्त राज्य स्तरीय नाट्यलेखन स्पर्धा या मध्ये राज्यातून आलेल्या विविध नाटकामधून तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच लेखक श्री. संकेत बेंद्रे यांच्या नाटक विभागातील कामगिरी पाहून मला महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला आहे. या अभूतपूर्व यशा नंतर सविनय सहर्ष सादर करीत आहेत दोन अंकी अद्भुत, रहस्यमय, विनोदी एक नव कोर नाटक "भुताच लग्न"या नाटकाचे लेखक / दिग्दर्शक कोकणातील खेड तालुक्यातील सुपुत्र श्री. संकेत बेंद्रे, निर्माते- ओमकार पाटील, संगीत-रुपेश जाधव, रंगभूषा - प्रीती मेंगे, प्रकाश योजना - प्रतीक शिंदे, सूत्रधार - प्रणया कांबळे तसेच हा पहिलाच प्रयोग सादर करणारे कलाकार आहेत कु. दिशा रणदिवे, हेमा नेरपागरे, राकेश मूकनाक, विकास मेंगे, अमेय रवींद्र आणि विस्मय कासार आणि सहकारी बरीच मेहनत घेऊन हा प्रयोग सादर होणार आहे. 
           या नाटकातील एक अद्भुत आणि विलक्षण कथेचा आणि नाटकाचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा असे आवाहन आयोजक आणि निर्माते यांच्या कडून करण्यात आले. त्या साठी Book my Show वर जाऊन ऑनलाईन तिकीट बुक करू शकता किंवा ९७६८३१३८५९/ ९९३०८९१४०६/ ९६१९१५०५९३/ ९३२६०८२७५१ या क्रमांकावर संपर्क करा.

No comments:

Post a Comment

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...