Thursday 2 March 2023

कसबापेठ निवडणूकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा कल्याण तालुक्यात जल्लोष, भाजपाचा पराभव ?

कसबापेठ निवडणूकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा कल्याण तालुक्यात जल्लोष, भाजपाचा पराभव ?

कल्याण, (संजय कांबळे) : शिंदे-फडणीस सरकारचे निम्मे मंत्रिमंडळ पुण्यातील कसबापेठ व चिंचवड निवडणुकीच्या मैदानात उतरून ही अखेरीस महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे तगडे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार ४० मतानी दारुण पराभव केला. हा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्ती वर मिळवलेला विजय आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली. त्यामुळे कल्याण तालुक्यातील गावा गावात या विजयाचा जल्लोष करण्यात आला.

कसबापेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अजित पवार, पासून ते अध्यक्ष शरद पवार अशा दिग्गजांनी निवडणुकीत प्रचार केला. तर दुसरीकडे शिंदे फडणवीस यांनी निम्मे मंत्रीमंडळ कसबा व चिंचवड निवडणुकीत उतरवले, इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क रोड शो केला, यावरही कडी करून मोठ्या प्रमाणात भाजपाने पैसे वाटप केले. या विरोधात तक्रार ही करण्यात आली. पण सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही असे येथेही दिसून आले. येथील प्रचारात ५० खोके एकदम ओके, गद्दारी, सत्तेचा दुरुपयोग, याबरोबरच महागाई, बेकारी, उद्योग बाहेर जाणे असे अनेक मुद्दे येथील प्रचारात गाजले. याचा परिणाम म्हणून गेली २८/३० वर्षे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ ला महाविकास आघाडीने भूसुंरग लावला. येथे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना तब्बल ७३ हजार २८४ एवढी मते मिळाली, त्यांनी भाजपाचे हेंमत रासने यांचा ११ हजार ४० मतानी पराभव केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्या सह महागाई ने वैतागलेल्या जनतेने या विजयाचा जल्लोष केला.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, रायते, गोवेली, गुरवली, टिटवाळा, मामणोली, चौरे, दहागाव, पोई, बापस ई,मानिवली, आपटी मांजर्ली, खडवली, आदी संपूर्ण तालुक्यात एकमेकांना पेढे भरवून, फटाके फोडून, आनंद, जल्लोष, साजरा करण्यात आला.

शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केलेली दादागिरी, दडपशाही, महागाई, या विरोधात कसबापेठ येथे मतदान झाले, अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे असे मत ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...