Sunday 5 March 2023

ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता. जि. रत्नागिरी मध्ये स्वछ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भ्रष्टाचार उघड करण्यास मुंबई आझाद मैदानात आमरण उपोषण !

ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता. जि. रत्नागिरी मध्ये स्वछ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भ्रष्टाचार उघड करण्यास मुंबई आझाद मैदानात आमरण उपोषण !

'पुरावा दाखवूनही संबधित अधिकारी गप्प'

मुंबई, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
    
             ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता. जि. रत्नागिरीमध्ये स्वछ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भ्रष्टाचार उघड करण्यास मुंबई आझाद मैदानात आमरण उपोषणचा मार्ग पत्करला आहे.आमरण उपोषणकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार श्री.निलेश रहाटे यांच्या आमरण उपोषणचा आज चौथा दिवस  असतानाही अध्याप ही शासनाने काहीही निर्णय घेतलेला नाही. 


            उपोषणकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार श्री निलेश रहाटे यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पासून थकवा जाणवत असून प्रकृती खालावत आहे. असे वाटते उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मा. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबाना आझाद मैदान येथे त्यानी स्वतः झालेल्या भ्रष्टाचारचे पुरावे हातात देऊन सुद्धा त्यावर विचार केला जात नसेल तर आमरण उपोषणामध्ये मरण आले तरी चालेल असे उपोषणकर्ते यांनी मत व्यक्त केले आहे.

             ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता.जि रत्नागिरी मध्ये स्वछ भारत मिशन ग्रामीण योजनेचा मोठया प्रमाणात भ्रष्टाचार ग्रामपंचायतमध्ये झालेल्या शौचालय वाटपमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामसेवकही नावावरही योजनेचा लाभ घेतलेला दिसून येत आहे. सरपंच पद किंवा सदस्यपद भरताना ही त्याना शौचालय दाखला देणे बंधनकारक असते. मग इतका या कामामध्ये हलगर्जीपणा का ते सर्व सिद्ध करूनही न्याय मिळत नसेल तर कोणावर विश्वास ठेवायचा असे मत अनेक ग्रामस्थांनी नाराजी दाखवत व्यक्त केले आहे. 

               जोपर्यत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र व्हीपीएम २०१६/प्र. क्र २५३ परा ३ या  परिपत्रकाप्रमाणे संबधित अधिकाऱ्यावर  कारवाई होत नाही तो पर्यत आमरण उपोषण हे चालूच राहणार असे श्री. निलेश रहाटे यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ! कोकण - ( दिपक कारकर )  अल्पवधीत सामाजिक क्षेत्रा...