Sunday 5 March 2023

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल, जळगाव शाळेचा 'वर्धापन दिन' उत्साहात साजरा !

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल, जळगाव शाळेचा 'वर्धापन दिन' उत्साहात साजरा !

जळगाव,  प्रतिनिधी - जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.श्री. सुशीलदादा अत्रे, चिटणीस श्री.अभिजीत देशपांडे, संस्थेचे विश्वस्त श्री. प्रेमचंदजी ओसवाल यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. सदर कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी शि.प्र. मंडळाच्या विद्यामितीचे प्रमुख प्रा.श्री. श.मु.छापेकर सर होते. कार्यक्रमाला शि.प्र. मंडळाचे सदस्य श्री. दिलीपशेठ मुथा, श्री. सचिन दुनाखे, शाळेच्या समन्वयिका सौ.लताताई छापेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुशील बोरसे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत साखरे ,जेष्ठ शिक्षक श्री. सुकदेव थोरात, सौ. मिनाक्षी कळसकर, पालक शिक्षक संघाचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पालक शिक्षक संघाच्या वतीने खाऊवाटप करण्यात आला. श्री.शरच्चंद्र छापेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाचे चिटणीस श्री.सागर पाटील  तर आभार प्रदर्शन श्री. अजय भिरूड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ! कोकण - ( दिपक कारकर )  अल्पवधीत सामाजिक क्षेत्रा...