Monday, 27 March 2023

साईबाबा नगर रत्‍नाबाई चाल बोरीवली पश्चिम मुंबई येथील रहिवाशांची पाणी समस्या सुनील पाटील यांच्यामुळे मार्गी !

साईबाबा नगर रत्‍नाबाई चाल बोरीवली पश्चिम मुंबई येथील रहिवाशांची पाणी समस्या सुनील पाटील यांच्यामुळे मार्गी !

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
             साईबाबा नगर रत्‍नाबाई चाल बोरीवली पश्चिम मुंबई येथील रहिवाशांसाठी गेले कित्येक वर्ष पाण्याची समस्या उद्भवत आहे. रहिवाशी यांना सांगण्यात आलेली नळ जोडण्याची रक्कम लोकांनी देऊन सुद्धा योग्य ती हालचाल होताना दिसत नव्हती.;त्यामुळे स्थानिक जनतेने आपली पाण्याची समस्या घेऊन (श्री साई सेवा संस्था बोरवली पश्चिम  साईबाबा) शी संपर्क केला. पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन संस्थेमार्फत या विभागाचे समाजसेवक, विभागाचे शिवसेना उपविभाग प्रमुख श्री.सुनील भाऊ पाटील यांच्याशी  संपर्क केला. संपर्क झाल्यावर पाटील यांनी सदर ठिकाणी रहात असणाऱ्या पाण्यासाठी त्रस्त रहिवाशांसाठी सवलतीच्या दरात प्रत्यक्ष जागेवर उभे राहून नळ जोडूनीचे काम करून घेतले. काम पूर्ततेमध्ये पाटील यांनी मोलाचे सहकार्य दिले. पाणी हे जीवन आहे,जल है तो कल है ! म्हणून येथील रहिवाशांच्या पाणी समस्यामध्ये पाटील यांनी नळजोडनी प्रसंगी प्रत्यक्ष भेट देत आणि लोकांसाठी लोकोपयोगी कामांमध्ये सहकार्य देत काम मार्गी लावले. वेळेत पाणी समस्या सोडवण्यासाठी योग्य सहकार्य केले त्याबद्दल येथील सर्व रहिवाशांच्या वतीने पाटील यांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...