कायद्यानुसार पती आणि सासरच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार किती? घटस्फोट झाल्यानंतर कोणते हक्क मिळतात? जाणून घेऊया.
भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
लग्नानंतर पत्नीला ( स्त्रीला ) तिच्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी जावं लागतं, त्याच ठिकाणी रहावं लागतं. पत्नीला पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरुप व्हावं लागतं. अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीत आपला किती अधिकार आहे याची जाणीव महिलांनी ठेवायला हवी.
पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क ; पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यतः मानलं जातं, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. याचे दोन पैलू आहेत जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे,
आपल्याकडे पत्नी ही पतीची अर्धांगिनी समजली जाते. त्यामळे जर पतीने स्वतः ती संपत्ती कमावली असेल तर त्यावर पत्नीचा आणि त्याच्या मुलांचा त्यावर पहिला अधिकार असतो.
जर एखादी व्यक्ती इच्छापत्राशिवाय मरण पावली, तर त्याची संपत्ती ही त्याची पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते. जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रात एखाद्याला आपला वारस बनवले तर संपत्ती त्याच्या त्याच वारसांकडेच जाईल.
सासरच्या संपत्तीवर स्त्रीचा हक्क किती जाणून घेऊया ; जर संपत्ती वडिलोपार्जित असेल आणि पतीचा मृत्यू झाला तर त्या संपत्तीवर महिलेचा अधिकार राहणार नाही. मात्र पतीच्या निधनानंतर स्त्रीला सासरच्या घरातून हाकलून देता येत नाही.
पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींना त्या महिलेला पोटगी द्यावी लागेल. पोटगी किती असावी. हे न्यायालय, ती महिला आणि तिच्या सासरच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे ठरवलं जातं.
जर त्या महिलेला मुले असतील तर त्यांना वडिलांच्या वाट्याची संपूर्ण मालमत्ता मिळेल.
विधवा महिलेने दुसरे लग्न केले तर तिला सासरच्या मंडळीकडून मिळणारी पोटगी थांबते. महिलांचा संपत्तीचा अधिकार किती तर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १४ आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७ अंतर्गत, महिलेला लग्नापूर्वी, त्या दरम्यान आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर (दागिने आणि रोख रकमेसह) पूर्ण अधिकार आहेत.
घटस्फोट झाल्यानंतर काय अधिकार आहेत? तर पतीपासून विभक्त झाल्यास, एखादी महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. पती-पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय घेतला जातो.घटस्फोटावेळी वन टाईम सेटलमेंटही करता येते. त्यामध्ये मासिक भत्त्याचाही समावेश होऊ शकतो.
घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला त्याची अधिकची पोटगी द्यावी लागेल. घटस्फोट झाल्यास पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार नसतो. महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल.जर पती-पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील, तर त्या प्रकरणात मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल.
No comments:
Post a Comment