Friday, 24 March 2023

महापशुधन एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !

महापशुधन एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न ! 

शिर्डी, अखलाख देशमुख, दि २४ : महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्प व मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे आयोजित देशातील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पो-२०२३ चे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

           शिर्डीचे साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने या प्रदर्शनास सुरुवात झाली. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 ,25 26 मार्च असे तीन दिवस हे प्रदर्शन सुरू असणार आहे. 

        यावेळी व्यासपीठावर खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, माफसू चे कुलगुरू शरद गडख, राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रताप पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नगर जि.प.मुख्याधिकारी आशिष येरेकर, महानंद चे अध्यक्ष राजेंद्र परजणे, नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, सिल्लोड न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे सांचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सिल्लोडचे शिवसेना नगरसेवक सुधाकर पाटील,प्रशांत क्षीरसागर, राजू गौर आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी* *बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी...