'मन की बातचा' रविवारी 100 वा भाग प्रसारित होणार - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.२७ :- प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना थेट संबोधण्यासाठी 'मन की बात' कार्यक्रम सुरू केला. येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. महानगरासह गावागावात कार्यक्रमाचे प्रसारण ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे जिल्हयातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अस्तीककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदीसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सुरू केलेला मन की बात कार्यक्रम अखंडीतपणे सुरू आहे. येत्या रविवारी या कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा उल्लेख केला आहे. 100 वा भाग विशेष असणार आहे, त्यामुळे 'मन की बात' कार्यक्रमाचा शंभरावा भाग सर्वांना ऐकता यावा, यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, अंगणवाडी तसेच जिथे जिथे शक्य आहे तिथे कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महानगरासह गावागावात कार्यक्रमाचे प्रसारण ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कराड यांनी केले.
जिल्हाधिकारी पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनीही 'मन की बात' कार्यक्रम ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगून नागरिकांनी मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment