Wednesday, 26 April 2023

केगाव जलसमृद्ध करण्यासाठी नॅब समृद्धीचा पुढाकार !

केगाव जलसमृद्ध करण्यासाठी नॅब समृद्धीचा पुढाकार !

मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) -

              दुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न आहे तेवढाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही रायगड मधील काही गावात आहे. त्यापैकी एक गाव हे केगाव होय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना गावातील मंडळी करत असतात त्यातच सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या पुढाकाराने ही समस्या कोकण संस्थेच्या टीमला कळवली आणि त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संस्थेने नाब समृद्धी या नाबार्ड च्या संस्थेला साकडे घातले आणि गावाला स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी आपल्या सीएसआर निधीतून या गावात वॉटर एटीएम आणि  पाणी स्वच्छता यंत्र देण्याचे मान्य केले होते.त्याचा आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
               गावचे सरपंच श्री.आशिष तांबोळी, उपसरपंच योगिता ठाकूर आणि ग्रामस्थांनी या कामात मोलाचे सहकार्य केले. आज झालेल्या सोहळ्यात नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती उषामणी पी. आणि नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेडच्या व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती आरती यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत तशाच पाणी ही सुद्धा मूलभूत गरज असून स्वच्छ पाणी सर्वाना मिळावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवल्याचे श्रीमती उषामणी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
                 या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील २० हजाराहून अधिक लोकांना याचा लाभ होणार असून लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला ग्रामसेवक रवींद्र म्हात्रे, कोकण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, सलीना बुटेलो, आजी - माजी सदस्य,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन दयानंद कुबल यांनी केले. या महत्वपूर्ण कामाचे अनेकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे. तर अनेकांनी यानिमित्ताने सर्वाना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...