Sunday, 30 April 2023

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिनाचे १ मे रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजन !

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिनाचे १ मे रोजी सकाळी ८.०० वाजता आयोजन !
 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.  ३० :  महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त १ मे २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे.
मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.२५ ते ९.०० वाजेच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९.०० वाजेनंतर आयोजित करावा असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...