जव्हार तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धान्य वाटप !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
महाराष्ट्र निर्माण सेने तर्फे अविनाश जाधव यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याचे औचित्य साधून धान्य वाटप करण्यात आले. हे धान्य पाथर्डी, रामखिंड जव्हारच्या शिवनेरी नगर परिसरात वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, गहू, हरभरे, साखर या जीवनावश्यक वस्तूचा समावेश होता. या वस्तू वाटप करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक निलेश घोलप, तालुकाप्रमुख गोपाळ वझरे, शहर प्रमुख नवीन घोलप,तसेच राज पहाडी, मेहुल अहिरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment