वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश मेळावा !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत पहिली च्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पहिली इयत्तेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा फुल देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आले.यावेळी रंगीबेरंगी फुगे, टोप्या, फुले,खाऊ चे वाटप करुन चिमुकल्या पावलांचे प्रथम शाळेतील पावलांचे ठसे कागदावर घेतले.
या अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केल्या मुळे विद्यार्थ्यां मध्ये प्रचंड उत्साह दिसला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सर्व पालकांना मार्गदर्शन केले व नवीन विद्यार्थ्यांचे फुले व पुस्तके देउन स्वागत केले.
या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, नितिन पिठोले शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, गणेश खादे, ग्रामपंचायत सदस्य, हर्षदा खादे ग्रामपंचायत सदस्य, निलेश गांगवे, सदानंद मेरे,कुंदन चौधरी, श्याम फसाळे शिक्षक अंगणवाडी कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment