कोकणाची वाट लावू नका ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन - प्रकाश आंबेडकर
कोकणातील बारसू रिफायनरीला आमचा विरोध आहे. एन्रॉनला घालवण्यातही आमची मोठी भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की, कोकणाची वाट लावू नका. कोकणात आजही ९५ % शुध्द ऑक्सिजन आहे. इथलं वातावरण अत्यंत शुद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व प्राणी इथे नव्याने जन्माला येतात.
त्यामुळे ही शुद्धता तशीच टिकली पाहिजे. राहिला कोकणातील लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर मी सर्वांना आठवण करून देईन की, अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, पूर्ण वेळ मिळाला तर मी कोकणचा कॅलिफोर्निया करू शकतो. ते खोटं नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी हा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं. प्रदूषणकारी उद्योग आणण्यापेक्षा इथल्या नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याच्याशी संबंधित कोकणी माणसाच्या उद्योगांना चालना दिली तर तेलंगणाप्रमाणेच इथल्या माणसाचे मासिक उत्पन्न वाढू शकते.
No comments:
Post a Comment