Sunday 30 April 2023

एक मे कामगार दिनानिमित्त *फ्रेंच राज्य क्रांतीचे* स्मरण आवश्यक !

एक मे कामगार दिनानिमित्त *फ्रेंच राज्य क्रांतीचे* स्मरण आवश्यक !  

लेखन - अमृत महाजन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयटक

'एक मे' ज्याला जागतिक कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील म्हणतात, हा दिवस कामगार व त्यांच्या चळवळींनी केलेल्या संघर्षांची आणि मिळवलेल्या यशाची आठवण करतो. हा कामगार दिन जगातील ८० देशांमध्ये दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. 

त्याची पार्श्वभूमी अशी..... १ मे १८८६ रोजी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर संघटनेने *आठ तास काम आठ तास आराम आठ तास परिवाराचे संगतीत जीवन* अशी कामगार जीवनाची दिवसाची दिनचर्या असावी म्हणून शिकागोत प्रचंड रॅली काढून मागणी केली. चिडलेल्या उद्योगपती वर्ग व त्यांचे सोजीरांनी त्यांचेवर हल्ला केला. त्यात काही कामगार मारले गेले. पुढे अमेरिकन उद्योगपतींच्या सरकारने रॅलीतील पुढाऱ्यांना जेलात टाकले. त्यांच्या कोर्टाने त्यांना कठोर शिक्षा सुनावल्या.. हा झाला कामगार दिनाचा इतिहास !! या संघर्षात ना जात, धर्म, ना पंथ आडवा आला !! त्यांनी फक्त जगातील कामगारांनो एक व्हा ! इन्कलाब जिंदाबाद !! अशा तऱ्हेच्या घोषणा देण्यात आल्या. भांडवलदार वर्गाला सतत कामगार कष्टकरी लोकांची भीती भेडसावते, त्यातूनच आठ तासाचा दिवस हा हक्क मंजूर करण्यात आला..  कामगारांच्या मूलभूत मागणीमध्ये जगात कुठेही तडजोड नाही. म्हणून जगातील ८० देशात हा दिवस साजरा केला जातो.

हिंदुस्थानातही लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानची स्थापना झाल्यानंतर आणि कॉम्रेड सिंगारवेलू चेट्टीयार यांनी या उत्सवाचे नेतृत्व केल्यानंतर १ मे १९२३ रोजी लोकांनी हा दिवस भारतात कामगार दिवस म्हणून पाळण्यास सुरुवात केली.... कामगार दिनानिमित्त सरकारने प्रत्येकाला राष्ट्रीय सुट्टी द्यावी, असा ठराव मांडण्यात आला. ती देखील मागणी मंजूर झाली. अर्थात कष्टकऱ्यांचा ह्या दैदिप्यमान लढयाची बीजे ५ मे १७८९ ला फ्रेंच राज्यक्रांतीने झाली. हेही लक्षात घेतले पाहिजे तोवर मानवी इतिहासात जगात फक्त सत्ताधारी वर्गाचे वर्चस्व होते. बहुसंख्या कष्टकरी श्रमिक यांना कुठे स्थान राहत नव्हते. त्यांनी जैसे ठेविले तैसेच राहावे लागेल असा त्रिकालाबाधित  सत्याचा दावा प्रस्थापित वर्गाने चालवला होता. तो समज फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्या १०० वर्षांनी कामगार वर्गाने केलेली शिकागोच्या चळवळीने मोडीत काढला.

*फ्रेंच राज्य क्रांतीची पार्श्वभूमी*

फ्रान्समध्ये अठराव्या शतकात सरंजामदार, सरदार, राजे, धर्मगुरू ही चांडाळ चौकडी जनतेवर मनमानी करत होती. अशावेळी रुसो यांच्या नेतृत्वाखाली ५ मे १७८९ ला फ्रान्सची राज्य क्रांती झाली. या क्रांति ने कामगारांना स्वातंत्र्य, समता, तथा विश्वबंधुत्व तत्वे दिली तर जागतिक कामगार कामगार दिनाने 'एकजूट करा.. संघर्ष करा' मूलमंत्र दिला, यामुळे हक्क मिळू शकतात व शोषणाला लगाम घालू शकतो हा एक आत्मविश्वास दिला. फ्रेंच राज्य क्रांतीने जमीनदार, सरंजामशाही,  सरदार आणि धर्म गुरूंची सत्ता उखडून फेकली
फ्रेंचचा राजा १४:वा लुई असे म्हणत असे की, देश व देशाची  सत्ता व्यक्तिगत त्याच्याच मालकीची आहे.

त्याच्या काळात जनतेकडून जास्तीचे कर वसूल करून एकीकडे जनतेचे शोषण केले जात असे, तर सुखी कुलीन वर्ग व पादरी कर देत नसत. उलट त्यांना राजा सवलती देत असे,  परिणामी संपूर्ण बोजा साधारण वर्गावरच पडतं असे. वाढती असमानता याने सोळाव्या लुईने फ्रान्सच्या कष्टकरी जनतेला जणू शापच दिला होता. त्याचे राजवटीत फ्रेंच जनता दोन वर्गात विभाजित झाली होती, त्यात विशेषाधिकार प्राप्त कुलीन लोग और पादरी यांचा वर्ग होय. यात .सरदार लढत.. तर पादरी प्रार्थना करत जनतेला प्रस्थापित वर्गाची सत्ता मजबूत करणारा पुराण मतवादी तथाकथित सदाचार शिकवत. ऐशोआरामात जीवन जगत, दुसरीकडे जनता ज्यादा करांचा बोजा पेलत।" अशी स्थिती फ्रेंच जनतेची होती.

शेतकरी त्यांच्या उत्पन्नातील उरलेला 20% हिस्सात अत्यंत हलाखीत जीवन जगत असे. त्यांना कष्ट करून भरघोस उत्पन्न जरी आले तरी त्यांना शेती परवडत नसे ...त्यातून फ्रेंच राज्यक्रांती झाली हे सत्य आहे, त्यानंतर औद्योगिक क्रांती  रासायनिक क्रांती सामाजिक आर्थिक क्रांत्या झाल्या. तरीपण कष्टकरी कामगारांची पिळवणूक व शेतकऱ्यांची लूट याचे वास्तव बदललेले नाही. म्हणून एक मे कामगार दिवस व पाच मे फ्रेंच राज्यक्रांती यांची आठवण कामगार वर्गाला करणे अनिवार्य आहे. एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानमित्ताने संपूर्ण देशभर सभा मिरवणुका परिसंवाद संघर्षाचे निर्धार केले  जात आहेत, या निमित्ताने देशात व विदेशात जेथे कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहे त्या सर्व कामगारांना बंधुत्वाचा पाठिंबा शुभेच्छा !! किमान १०,००० रु  निवृत्ती वेतन, योग्य वेतन, रोजगार शाश्वती निवारा, सन्मानाचे जीवन, अन्न व आरोग्य सुरक्षा यासाठी संघर्ष देत आहेत, त्याबरोबर तरुणांना काम मिळावे महागाई रोखण्यात यावी. आरोग्य शिक्षणावर पूर्ण खर्च सरकारने करावा या सुद्धा कामगार वर्गाचा मूलभूत मागण्या आहेत. भारतात कामगार, शेतकरी यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत असून  जगातील कामगारांनो एक व्हा ! इन्कलाब जिंदाबाद !! या घोषणा देताना कामगारांमध्ये ज्या धर्म पंथ जात आधाराने त्यांना विभाजित करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. 

शेतकऱ्यांच्या चळवळीला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येऊन अन्नदात्याच्या आंदोलना चा अवहेलना करण्यात आली त्यांच्या रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले. कामगारांनी लढून मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करून चार कामगार संहिता मोदी सरकार लादत आहे. ज्यात कामगारांचे हक्क संकुचित केले जात आहेत, संघटित सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून संघटित कामगारांचे खच्चीकरण केले जात आहे. सरकारी उद्योगधंदे विक्रीस काढून त्यातील कामगारांची संख्या कमी केली जात आहे. नवीन कामगार भरती ठप्प आहे. त्याचबरोबर बेलगाम कंत्राटीकरण करून कामाचे तास वाढवले गेले आहेत आणि येथेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस उद्दिष्टांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे. जीएसटी च्या रूपाने जनतेकडून भरमसाठ कर  वसूल केले जात आहेत पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, बी बियाणे, शेती उपयोगी औषधे, मानवी औषधे, काम साहित्य, जीवनावश्यक वस्तू सर्वच महाग होत चाललेले आहे, त्यात तळागाळातील असंघटित संघटित कामगार भरडला जात आहे .निवडक कार्पोरेट घराणे यांची मालमत्ता आकाशाला गवसणी घालू लागलेली आहेत ही फ्रेंच राज्य क्रांतीचे वेळची सामाजिक आर्थिक स्थितीची आठवण करून देत आहे म्हणून मे दिनाच्या निमित्ताने तमाम कष्टकरी जनतेला शेतकरी जनतेला आवाहन की, राखेतून फिनिक्स पक्षी जिवंत व्हावा त्याप्रमाणे कष्टकरी वर्गाने उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी जगातील कामगारांनो, एक व्हा ! धर्मजात पंथ बाजूला सारा !! सर्व धर्म जात पंथातील कष्टकऱ्यांनो एक व्हा इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा घेऊन शिकागोतील कामगारांचा बलिदानाच्या लाल झेंडा पुन्हा उभा करा. हे आवाहन

कॉम्रेड अमृत महाजन - +91 98605 20560

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...