सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्टला केवळ शंभर ब्रास माती उत्खननाची परवानगी असताना हजोरो ब्रासचा भराव !
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हाधिकारी यांचेकडील रेती गट, गौणखनिज शाखा यांनी प्रसिद्ध अश्या सेंच्युरी रेआँन कंपनीच्या कांबा पावशेपाडा येथील बिट्स स्कूल आँफ मँनेजमेन्ट ला केवळ १०० ब्रास माती उत्खननाची परवानगी दिली असताना प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास माती, दखड, मुरुम, विटा याची भरणी केली असून यामुळे पावशेपाडा गावाला जलसमाधी मिळणार तर आहेच शिवाय शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणा-या या मँनेजमेन्ट विरोधात पावशेपाडा गावातील ग्रामस्थांनी कल्याण तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.
कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत पावशेपाडा येते २५ हेक्टर ३६ गुंटे इतक्या जागेवर जागतिक पातळीवर विद्यापीठ निर्मितीचे काम प्रसिद्ध अशा सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट कडून सुरू आहे. प्रांरभीच्या काळात कांबा ग्रामपंचायतीकडून विविध ना हरकत दाखल्यासाठी मँनेजमेन्ट ने ग्रामपंचायतीला विविध आश्वासने लिखित स्वरूपात देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही, शिवाय ग्रामसभा, विविध बैठकीला मँनेजमेन्ट चे कोणीही येत नसल्याने आणि पावशेपाडा ग्रामस्थांच्या या विरोधात तक्रारी वाढत असल्यामुळे कांबा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मँनेजमेन्ट ला नोटीस बजावली, यावर सरपंच भारती भगत, उपसरपंच संदिप पावशे, सदस्य पदमाकर सुरोशे, दत्ता भोईर, संतोष पावशे, श्रीम,सुंगधा पावशे, छाया बनकरी, ईशा भोईर, सोनाली उबाळे, वंदना पावशे, उषा गांवडे आणि अरुण सुरोशे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यानंतर मँनेजमेन्ट ने सदर जागेत माती उत्खनन साठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडिल रेतीगट गौण खनिज शाखा यांना परवानगी मागितली, त्यानुसार या शाखेने "आदेश टे ४ कावि G14/22 दि ११/१/२०२२ अन्वये" केवळ१००ब्रास माती उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षात या परिसरात हजोरो ब्रास दगड, विटा, मुरुम, खडी याची भरणी केली आहे. ही कोठून आली, यावर मँनेजमेन्ट कडून असे बोलण्यात येते की, हा भराव बाहेरून मागविण्यात आला आहे. असे असले तरी गावातील चंद्रकांत वामन भगत यांच्या घरामागे २०/२५ फुट खोदकाम केले आहे ते काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात केलेल्या भरावामुळे पावशेपाडा गावातील अनेकांच्या घरात पाणी घुसणार आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडविणा-या आणि ग्रामस्थांना धोकादायक ठरू शकणाऱ्या या बिट्स स्कुल आँफ मँनेजमेन्ट विरोधात चौकशी करून त्यांनी केलेल्या भरावाचे मोजमाप करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत वामन भगत व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख यांच्या कडे केली आहे. तसेच या विरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल असेही ग्रामस्थांनी सांगितले.
No comments:
Post a Comment