महाराष्ट्र दिनी "आपला दवाखाना"चे मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते लोकार्पण !
*नागरिकांना मिळणार मोफत उपचार*
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईतील विविध प्रभागांमध्ये यशस्वीपणे "राबविण्यात आलेल्या *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे " उद्घाटन आणि लोकार्पण आज सकाळी १०.०० वाजता कल्याण पश्चिमेतील वायले नगर येथील तारांगण इमारतीत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे शुभहस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मा. कपिल पाटील- केंद्रीय मंत्री पंचायत राज (भारत सरकार) हे ऑनलाईन प्रणालीद्वारे आणि महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, आरोग्य प्रशासन उपायुक्त डॉ.सुधाकर जगताप, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डोईफोडे आणि डॉ. विनोद दौंड , कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत ,माजी पालिका सदस्य रवी पाटील, सुनील वायले तसेच संबंधित नागरी आरोग्य केंद्र व आपला दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील सदर ठिकाणी उपस्थित होते.
गोरगरीब व सामान्य जनतेला या विनामुल्य सेवेचा लाभ घेता यावा याकरिता याप्रकारच्या दवाखान्यांची व्याप्ती टप्याटप्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी या लोकार्पणसमयी दिली.
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' मार्फत शहरातील नागरिकांना मोफत उपचार व विविध आरोग्य सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध होणार आहेत. या दवाखान्याची बाहयरुग्ण सेवेची वेळ दु.२.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत असेल. तसेच या दवाखान्याच्या माध्यमातून असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन इ. कार्यक्रम राबविण्यात येणार असून बाहयसंस्थेद्वारे रक्त व लघवीच्या तपासण्या करण्यात येणार आहेत, या दवाखान्यामुळे जवळच्या परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.” अजुन 7 आरोग्यवर्धिनी केंद्र कल्याण डोंबिवली महापालिकेकरीता मंजुर करण्यात आलेली असून सदरची केंद्र टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत.” अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment