Monday, 1 May 2023

बुध्दभूमी फाउंडेशन, कल्याण यांनी २५६७ व्या बुध्द पौर्णिमेनिमित्त दि. ४,५ मे रोजी केले विविध कार्यक्रमांचे आयोजन !

बुध्दभूमी फाउंडेशन, कल्याण यांनी २५६७ व्या बुध्द पौर्णिमेनिमित्त दि. ४,५ मे रोजी केले विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कल्याण, प्रतिनिधी : बुद्धभूमी फाउंडेशन, सम्राट अशोक नगर, वालधुनी, कल्याण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध स्थळ आहे. मॅनमार, थायलंड, अमेरिका, श्रीलंका, व्हियतनाम, जपान, कोरिया इत्यादी या देशातील प्रतिनिधी, राजदूत, मंत्री व भन्तेजी यांनी या भूमिस भेट दिलेली आहे, आशा या भूमीत सतत कार्यरत असलेले भन्ते गौतमरत्न थेरो यांच्या मार्गदर्शना खाली २५६७ वैशाख बुद्ध पौर्णिमा २०२३ निमित्त दि. ४,५ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

अंतर्गत दान दाते, देणगीदार, उपासक, उपसिका, धम्म सेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या सहकार्याने दिनांक ४ मे गुरुवार २०२३, भव्य धम्मरॅली शंकरराव चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राष्ट्रपिता जोतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा ते बुद्धभूमी फाऊंडेशन, अशोक नगर, वालधुनी, कल्याण येथे खिरदानाने समारोप. दिनांक ५ शुक्रवार २०२३ दुपारी ३ वाजता बुद्धभूमी फाउंडेशन पटांगण धम्म ध्वजारोहण, विपश्यना, नाट्य प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक व्याख्यान, बार्टीच्या विद्यार्थ्यांना पीएचडी आणि फेलोशिप या साठी संघर्ष करून यशस्वी झालेल्या विद्यार्थी आणि त्यांना सहकार्य करणारे दान दाते देणगीदार, मार्गदर्शक आणि बुद्धभूमी साठी कार्य करणारे कार्यकर्ते यांचा गुणगौरव व सत्कार, बुध्दभीम गीतांचा कार्यक्रम आशा या भरगच्च सुंदर  कार्यक्रमाची माहिती आज दिनांक १ मे सोमवार २०२३ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी बुध्द पौर्णिमा महोत्सव समितीतर्फे अध्यक्षा - नंदिनी ताई साळवे, सचिव - डॉ. विद्या शिर्के-बाळदकर, कोषाध्यक्ष - इंजि. बिरजू जाधव, उपाध्यक्ष - सुरेश कटारे, डॉ. मारिया फर्नांडिस-गायकवाड, प्रसिद्ध प्रमुख - कुसुम चंद्रुमोरे, विनय फुलपगार, सदस्य - शिल्पा चंद्रमणी मेश्राम, राजू रोकडे, कैलास गायकवाड, मिनाक्षी शेवाळे, अनिल कीर्तने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...