ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्न ग्रामविकासमंत्र्यांच्या बैठकीत सोडवू - 'आ. कुमार आयलानी'
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रश्न लवकरच राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन सोडवण्यात येतील असे आश्वासन उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी यांनी ठाणे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या जिल्हास्तरीय कांबा सिध्देश्वर मंदिरात आयोजित मेळाव्यात दिले. यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ही मान्यता प्राप्त संघटना कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असते. या संघटनेच्या माध्यमातून १ मे या कामगार दिनी जिल्हा मेळाव्याचे आयोजन कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर पाचवा मैल येथे करण्यात आले होते.
युनियनचे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार कुमार आयलानी, किसन कथोरे आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांचे मला मोठा पुष्पहार घालून स्वागत केले. यानंतर
प्रास्ताविक करून युनियनची ध्येय धोरणे, अडचणी, प्रश्न, समस्या मांडल्या.
ग्रामपंचायत कर्मचारी हे महापालिका कर्मचाऱ्यांऐवढेच काम करतात परंतु त्यांना मिळणाऱ्या पगारात किती तफावत आहे, त्यांना सर्व सोईसुविधा मिळतात. पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काय? तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कर्मचारी व त्यांच्या कुंटूबियाचे काय?
असा सवाल अध्यक्ष अजय जाधव यांनी उपस्थित केला. याप्रसंगी आ कुमार आयलानी यांनी सांगितले की, लवकरात लवकर राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समोर मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तर मी सरपंच असलेल्या पासून ग्रामपंचायतीशी संबधीत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
यावेळी राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ, कार्याध्यक्ष काझी साहेब, सचिव अशोक भाऊ, उपाध्यक्ष दिलीप डि के, विकास भोईर, दिंगभर सोनटक्के, विनायक माने, रामेश्वर गायकी, दत्ता भोईर यांच्या सह महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment