वीर राघोजी भांगरे यांच्या १७५ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृह येथे अभिवादन !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या १७५ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृह येथे अभिवादन करुन पुप्ष हार अर्पण करण्यात आले.
यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री मा. मधुकर राव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, उपसभापती प्रदीप वाघ, युवा राज्य अध्यक्ष लकीभाऊ जाधव, जिल्हा बँक संचालक दिलीप पटेकर, जेष्ठ नेते विष्णू हमरे, मंगेश दाते, नंदकुमार वाघ, विठ्ठल गोडे, दशरथ पाटील, संजय वाघ, अक्षय शिंदे उपस्थित होते.
यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदरणीय मधुकरराव पिचड यांच्या पाठपुराव्यामुळे वीर राघोजी भांगरे यांचे स्मारका साठी निधी मंजूर झाला आहे. तसेच प्रदीप वाघ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानले.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजातील वीर राघोजी भांगरे यांनी इंग्रजां विरोधात बंड उभे केले होते आणि अशा थोर क्रांतिकारकाचा इतिहास हा गौरवशाली आहे. साहित्यिक व आदिवासी समाजाचे भुषण डॉ गोविंद गारे यांच्या पुस्तकातुन राघोजी चा इतिहास समाजाला कळला असे हि प्रदीप वाघ यांनी सांगितले.
वीर राघोजी भांगरे यांच्या १७५ व्या स्मृती दिनानिमित्त सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातुन शेकडो कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment