कल्याण चे तत्कालीन तहसिलदार नितीन चव्हाण यांच्या कडे वाशिम जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पदाची जबाबदारी !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांच्या कडे वाशिम जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
कल्याण तहसीलदार म्हणून सन २००८ ते २०११ या कालावधीत नितीन चव्हाण हे तहसीलदार म्हणून कल्याण तालुक्यात कार्यरत होते. शांत, संयमी, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य तत्पर, आणि प्रशासकीय सेवेचा चांगला अनुभव असणारे श्री चव्हाण यांनी कल्याण तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महसूल विभागातील विविध प्रलंबित प्रकरणे, कामगार, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांचे प्रश्न मार्गी लावले, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक निवडणूका त्यांनी समर्थपणे यशस्वीपणे पार पाडल्या होत्या यामध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा समावेश होता. असे नितीन चव्हाण यांची उरुण तहसीलदार, कोकण विभागात सामान्य प्रशासन व पुढे अमरावती विभागात प्रमोशनने वाशीम जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. वाशीम जिल्ह्यात कारंजा, मंगरूळपिर, मानोरा, मालेगाव असे ११ तालुके आहेत.हेमाडपंथी मंदिरे आणि असंख्य तलावासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर सुमारे ६९८ गावे जिल्ह्यात आहेत.
अश्या वाशीम जिल्ह्याच्या अप्पर जिल्हादंडाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन चव्हाण यांच्या कडे सोपविण्यात आल्याने कल्याण तालुक्याचे पत्रकार संजय कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, विलास भोईर, रवींद्र घोंडविदे, अभिजित देशमुख, राजलक्ष्मी पुजारी, आदी पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment