Monday, 22 May 2023

BYF तांबापूर युनिट तर्फे मोफत मतदान कार्ड शिबीर !

BYF तांबापूर युनिट तर्फे मोफत मतदान कार्ड शिबीर !

*BYF तांबापूर युनिटचे मोठे यश*

जळगाव, अखलाख देशमुख, दि २२  :  BYF (ब्राइट युथ फाऊंडेशन) जळगाव शहरात सातत्याने समाजसेवा करत आहे.  यानिमित्त BYF तांबापूर युनिटतर्फे रविवार 21 मे 2023 रोजी मोफत मतदान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

ज्यामध्ये 250 हून अधिक मतदान कार्ड बनविण्यात आले होते. यावेळी बीवायएफचे अध्यक्ष शीबान फाईज़ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, फाउंडेशन सुरू होऊन दोन महिनेही झाले नसून फाऊंडेशन दर आठवड्याला समाजासाठी चांगले आणि यशस्वी काम करत आहे. फाऊंडेशन जळगावातील विद्यार्थी व युवकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून संपूर्ण शहरात परिश्रम घेणार आहे. 

यावेळी बीवायएफचे अध्यक्ष शीबान फाईज़, उपाध्यक्ष अक्रम देशमुख, सोशल ग्रुपचे अध्यक्ष समीर खान, तांबापूरचे अध्यक्ष युसूफ खान, सामाजिक कार्यकर्ते वसीम बापू, आसिफ शाह, सोनू, जाकीर सय्यद, शोएब खाटिक, रिजवान बागवान, तन्वीर पटेल, इक्बाल शेख आदी उपस्थित होते. या शिबिराच्या प्रसंगी आयुब चाचा, मुस्लिम कॉलनी युनिटचे अध्यक्ष हुजैफा शेख, उपाध्यक्ष अरबाज खाटिक, सोशल मीडियाचे अध्यक्ष रिजवान शेख, सचिव फैजान रफिक, संस्थापक सदस्य अकीफ पटेल, वसीम खान, जुनेद शाह, करीम लाला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...