Saturday 6 May 2023

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातुन दोन दशकापासुन हा उपक्रम !

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातुन दोन दशकापासुन हा उपक्रम !    

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि  ६ : सालाबादप्रमाणे याही वर्षी सिल्लोड येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा पार पडला. जवळपास 151 जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून दोन दशकापासून हा उपक्रम दरवर्षी राबविल्या जातो. 

         या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षतेस्थानी कृषिमंत्री अब्दुल सत्तार होते. तर नवदाम्पत्यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देण्यासाठी अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना जावेद पटेल, मौलाना मुसा तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अ. सत्तार, राजेंद्र ठोंबरे, अजीज बागवान, दामूअण्णा गव्हाणे, रउफ बागवान, अकिल वसईकर, सत्तार बागवान, विठ्ठल सपकाळ,आसिफ बागवान, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशाकीय अधिकारी रईस खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

        आज समाजामध्ये लग्ना सारख्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे.यातून कर्ज बाजारीपणा वाढत आहे. हा खर्च टाळण्यासाठी  प्रत्येक समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची गरज आहे असे स्पष्ट करीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरु केलेल्या सिल्लोड येथील मुस्लिम सामूहिक विवाह सोहळयाने समाजपुढे एक आदर्श  ठेवला असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तनावी यांनी सिल्लोड येथील सामूहिक सोहळ्याप्रसंगी केले.
 
       
         इज्तेमाई शादियाँ म्हणजे अनावश्यक खर्चाला दूर ठेवून केलेले लग्न आहे. करीता मुस्लिम समाजाने याचे भान ठेवावे. आयुष्यात शिक्षण आणि संस्काराला अधिक महत्व आहे. शिक्षण एक अशी ऊर्जा आहे यातून आयुष्य आनंदात व समृद्धपणे जगता येते, मुस्लिम समाजाने कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी केले.

*सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज - कृषिमंत्री अब्दुल सत्तार*
     
     सद्य परिस्थिती पाहता सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. गेल्या काळात चिरंजीव उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा विवाह देखील याच सामूहिक विवाह सोहळ्यात केला असल्याची आठवण मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. सिल्लोड येथे आम्ही सामूहिक विवाहची परंपरा गेल्या 20 वर्षापासून जपून ठेवलेली आहे असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.

      जवळपास गेल्या दोन दशकापासून सिल्लोड येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी व मित्र मंडळाच्या वतीने मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवीन दांपत्यास संसार उपयोगी साहित्य तसेच येणाऱ्या पाहूण्यामंडलींसाठी जेवण , पाणी  इत्यादि आदरतिथ्य आयोजकांच्या वतीने करण्यात येते. गेल्या काळात हजारो मुस्लिम तरुणांनी या सोहळ्यात आपला निकाह केल्याने त्यांची आर्थिक बचत झाली. लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कामी आला. मागील  काळात हजारो युवकांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला. पुढील वर्षी 555 जणांचा विवाह या इज्तेमाई शादियाँ मध्ये करण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...