Saturday 6 May 2023

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सातपाटी गावात मोफत उपक्रम !

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सातपाटी गावात मोफत उपक्रम !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

         संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्वतःच्या उत्पन्नातील ८०% रक्कम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खर्च करून ८ ठिकाणी मोफत सी बी एस ई शाळा, १३० खाटांचे सुसज्ज मोफत रुग्णालय, १० रुग्णवाहिका, प्रत्येक वर्षी २५ लाख वह्या वाटप, मोफत शेतकऱ्यांना फळ झाडे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी बनावे म्हणून संपूर्ण कोकणात ४3 ठिकाणी मोफत upsc/mpsc वाचनालये सुरू करून विद्यार्थांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जात आहे. त्यामाध्यमातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी यशस्वी  झाले असून अधिकारी घडवणे हेच जिजाऊ संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
       माझा गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व इयत्ता 10 वी चे भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने मा. सांबरे साहेबांनी सातपाटी गावातील विद्यार्थ्यांसाठी क्लासेस  सुरु केले आहेत. त्याचं प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स व इतर खेळांची माहितीचे देखील ट्रेनिंग चालू केले आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार केला असता गरिबी अत्यंत जवळून दिसत आहे त्यामुळे महिलांनी देखील आपल्या पायावर उभ राहून स्वयंरोजगार करावा यासाठी महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस ची देखील सुरुवात सातपाटी गावामध्ये केली आहे.
या उदघाटन प्रसंगी मा. सरपंच मॅडम, ग्रामपंचायत सदस्य मॅडम व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हे सर्व उपक्रम निलेश सांबरे यांनी सातपाटी वासियांसाठी मोफत सुरु केले आहेत.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...