Saturday 6 May 2023

शिर्डीतील सहा हॉटेलवर छापा टाकून केली १५ पीडित मुलींची सुटका, ११ जणांना केले अटक, हॉटेलही होणार सिल !

शिर्डीतील सहा हॉटेलवर छापा टाकून केली १५ पीडित मुलींची सुटका, ११ जणांना केले अटक, हॉटेलही होणार सिल !

भिवंडी, दि,६, अरुण पाटील, (कोपर) :
           शिर्डीमध्ये भाविक साई बाबांच्या  दर्शनासाठी दूरदूर वरून येत  असतात. मात्र इथे अनैतिक धंदे सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असता पोलिसांनी अनैतिक अवैध धंदे सुरु असलेल्या शिर्डीतील सहा हॉटेलवर एकाचवेळी रात्री छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल १५ पीडित मुलींची सुटका केली. तसेच हॉटेल चालकांसह ग्राहक म्हणून आलेल्या ११ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शिर्डीसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
            सविस्तर हकीगत अशी की, शिर्डीतील काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक अवैध धंदे सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. या महितीच्या आधारे पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी इतर पोलिसांना सोबत घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, शिर्डीसह अन्य तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची वेगवेगळी सहा पोलिस पथके तयार करण्यात केली.
           त्यानंतर शिर्डीतील अनैतिक अवैध धंदे सुरू असलेल्या या सर्व हॉटेलमध्ये डमी ग्राहक म्हणून काही पोलिसांना पाठवले . खबऱ्या मार्फत मिळाली माहिती खरी असल्याचे समजले असता पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह पोलिस पथकांनी एकाचवेळी शिर्डीत अनैतिक अवैध धंदे सुरू असणाऱ्या सहा हॉटेलवर , ५ मे रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला होता.
       या अटक आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील अनैतिक अवैध धंदे सुरु असलेल्या सहा हॉटेलवरही पोलिसांनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व हॉटेल सिल करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांच्याकडे सदर करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी यावेळी दिली आहे. शिर्डीमध्ये मोठी कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...