Saturday 6 May 2023

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात दहा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, प्रांताधिका-यांनी परवानगी दिली असताना विहीर चोर म्हणून समाजसेवकाची केली बदनामी !

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात दहा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, प्रांताधिका-यांनी परवानगी दिली असताना विहीर चोर म्हणून समाजसेवकाची केली बदनामी !

उल्हासनगर, (प्रतिनिधी) : कल्याण उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी २२ आँगस्ट २०२२ रोजी कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील विहीर बुजविण्याची परवानगी दिली असल्याने वरप येथील प्रसिद्ध सेक्रेट हार्ट स्कुल चे व्यवस्थापक तथा समाजसेवक अलबिन सर यांनी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून 'ती, विहिर बुजवली, परंतु कोणतीही सत्य परिस्थिती जाणून न घेता कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी 'विहीर चोर म्हणून बदनामी केल्याने यांच्या विरोधात तब्बल १० कोटी अब्रुशूकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय याबाबत संबंधित प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांनाही कायदेशीर नोटिस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले.

कल्याण तालुक्यातील वरप येथे सेक्रेट हार्ट स्कुल नावाची शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर अशी संस्था आहे .या संस्थेच्या माध्यमातून शाळेचे व्यवस्थापक अलबिन सर यांनी आतापर्यंत शेकडो, हजारो गोरगरीब, आदिवासी, दिन दलित, यांना वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक मदत केली आहे. कित्येकांचे संसार वाचविले आहेत. अनेक निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ते म्हारळ, वरप, कांबा, या परिसरात समाजसेवक म्हणून परिचित झाले आहेत.
आज कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल पर्यंत जो सिंमेट काँक्रीटचा रस्ता साकारत आहे, त्याच्यात सिंहाचा वाटा हा अलबिन सर यांचा आहे.

असे असताना सरांनी कांबा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं १०२/४ मधील काही जागा विकत घेतली. या जागेत एक विहीर होती, ती दलित बांधवची असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी या विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता, शिवाय गावात पाईपलाईन ने पाणीपुरवठा होत असल्याने या विहिरीचे पाणी कोणी वापरत नव्हते, शिवाय या विहिरीकडे ग्रामपंचायतीने देखील दुर्लक्ष केले होते. यामुळे शाळेचे अल्बीन अँन्थोनी चियाडन १७ आँगस्ट २०२२ रोजी वापरात नसलेली विहीर बुजविण्याबाबतीत कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार तलाठी सजा कांबा यांनी अहवाल दिला त्यामुळे सदर विहीर पडिक व धोकादायक असल्याने जीवीत हानी होण्याचा धोका असल्याने विहीर बुजविण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे पत्र दिले आहे. यानुसारच अल्बीन सर यांनी ८/१० महिन्यापूर्वी विहीर बुजवली असताना आता ग्रामपंचायतीचे सरपंच भारती भगत व उपसरपंच सोनाली उबाळे यांना जाग आली असल्याचे बोलून कोणत्याही प्रकारची सत्य परिस्थिती जाणून न घेता मला विहिर चोर, म्हणून काही समाजमाध्ममातून बदनामी करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. असा आरोप करून यामुळे मला शारीरिक, मानसिक त्रास झाला, माझी प्रतिमा मलिन केली गेली आहे. मला रितसर ३ नोटिसा देऊन मी जर त्याचे उत्तर दिले नाही तर माझ्या वर कारवाई करायला हवी. परंतु असे न करता सरपंच, उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर केला म्हणून त्यांची पदे रद्द करावी म्हणून ग्रामविकासमंत्री तसेच न्यायालयात याचिका दाखल करणार असून अब्रूनुकसानीचा १० कोटीचा दावा देखील दाखल करणार असल्याचे अल्बीन सर यांनी सांगितले. शिवाय ज्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियावर एकतर्फी बातम्या चालवून माझी बदनामी केली त्यांना ही कायदेशीर कारवाई ला सामोरं जावं लागेल असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांच्या विरोधात तब्बल १० कोटीचा दावा दाखल करण्याची ही ठाणे जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी असे वाटते.


.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...