जळगाव, अखलाख देशमुख, दि ७ : BYF (ब्राईट युथ फाऊंडेशन) तर्फे जळगावातील मुस्लिम कॉलनी परिसरात मोफत मतदान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नवीन मतदान कार्ड व मतदान कार्डमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. या शिबिरात ७० हून अधिक लोकांच्या मतदान पत्रिकांमध्ये नवीन मतदान कार्ड व दुरुस्त्या करण्यात आल्या.
यावेळी BYF च्या अध्यक्षा शीबान फाइज़ यांनी समाजात आपले कार्य करत राहणार असून त्याच बरोबर शहरी लोकांचे प्रश्न शक्य तितके सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून विद्यार्थी व युवकांना आवाहनही केले की या फाऊंडेशन विद्यार्थी आणि तरुणांचे आहे. म्हणूनच या फाउंडेशनमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि शहरातील तरुण आणि विद्यार्थ्यांची शक्ती मजबूत करण्यासाठी BYF ला पाठिंबा द्या. BYF अध्यक्ष शीबान फैज, BYF उपाध्यक्ष अक्रम देशमुख, BYF सोशल ग्रुपचे अध्यक्ष समीर खान, मुस्लिम कॉलनी युनिटचे अध्यक्ष हुजैफा शेख, मुस्लिम कॉलनी उपाध्यक्ष अरबाज खाटिक, सोशल मीडिया अध्यक्ष रिजवान शेख, दानिश खाटीक, फैजान शेख, जलाल भाई, मोहसीन भाई, मुसाववीर भाई आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment