औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २२ : भारताच्या लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.
संयमी परंतु कणखर नेतृत्व असलेले राष्ट्रवादी कॅाग्रेंस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.Jayant Patil - जयंत पाटील यांना विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने ईडी कार्यालयाने नोटीस देऊन आज चौकशीस बोलावले होते याचा निषेध म्हणुन व इतर विविध राजकीय विषयांवर आज सोमवार 22 मे 2023 रोजी रा.कॅा.पा.तर्फे क्रांतीचौक येथे सकाळी 10 वाजता भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली होती याला पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment