Thursday, 8 June 2023

तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला अटक !!

तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला अटक !!



नाशिक, प्रतिनिधी : डीपी बसविण्यासाठी लाच घेणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञान हेमंत खैरनार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

याबाबत विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या शेताजवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत आहे.

त्यामुळे त्यांनी वायरमन हेमंत उर्फ पप्पू खैरनार यांची भेट घेतली. त्याने शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसून देण्याचे मोबदल्यात 30 हजार रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात 2 हजार रुपये अशी एकूण 32 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत...